|
साहित्यसंपदा.कॉम ५५०+
वाचकांची आवड जोपासणं आणि वाचन संस्कृती रुजवणं या उद्देशाने तयार झालेल्या साहित्यसंपदा डॉट कॉम ह्या ऑनलाईन लायब्ररीला सुरु होऊन १८ महिने उलटून गेले आहेत. वाचकांच्या प्रोत्साहनामुळे व समर्थनामुळे साहित्यसंपदाने ५५०+ पुस्तके उपलब्ध करण्याचे यश या थोडक्या कालावधीत संपादन केले आहे. या यशात वाचकांनाही सामील करण्याचे साहित्यसंपदाने ठरवले आहे. या निमित्त त्यांनी प्रत्येक वाचकाला एक बोनस जाहीर केला आहे आणि तो त्यांच्या लायब्ररी फी मध्ये जमा केला आहे. या निमित्ताने बरेच जुने वाचकांचे खाते पुनरुज्जीवित झाले आहेत. याच उत्साहात साहित्यसंपदाने या काळात असलेल्या वाचकांपैकी उत्कृष्ट वाचक हा पुरस्कार जाहीर केला आहे. हा उत्कृष्ट वाचकाचा मान मुंबई, जोगेश्वरी येथील "हर्षदा वैद्य" यांनी पटकावला आहे. साहित्यसंपदा टिम ने हर्षदा वैद्य यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या मित्र वा मैत्रिणीला साहित्यसंपदावर आमंत्रित करा व मिळवा ६ रु. बोनससाहित्यसंपदा घेऊन आली आहे एक नविन योजना. साहित्यसंपदा चे मेंबर यात सहभागी होऊ शकतात. यासाठी साहित्यसंपदावर प्रवेश केल्यानंतर 'Invite Friend to Sahitya sampada and Get Bonus' या लिंक वर क्लिक करावे. आपल्या मित्र/मैत्रिण चे नाव व इमेल चा पत्ता टाकावा व बटन दाबावे. साहित्यसंपदा तुमच्या मित्राला त्वरीत मेल पाठवेल. तुमच्या मित्र/मैत्रिण ला साहित्यसंपदावर नविन खाते उघडण्यास सांगावे. नविन खात्याची माहिती भरतांना इमेल पत्ता तोच टाकावा ज्यावर त्यांना आमंत्रण मिळाले आहे. तसेच त्यांना कोणी आमंत्रण पाठवले त्यांचे नाव तेथे निवडावे. तुमच्या मित्राचे अकाऊंट चालु करताना तुमच्या अकाऊंट मधे ६ रु. जमा होतील. त्वरा करा व आपल्या मित्रांना/मैत्रिणींना आमंत्रित करा. अनेक मित्र व मैत्रिणींना आमंत्रित करा व मिळवा खुप बोनस.
|