Name of Book : एकादश

Name of Author : श्रीमती अरुणा चौधरी

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 60

Synopsis :
सकाळी सकाळीच दारावरची बेल वाजली. मी बघते तर दारात रेणुका उभी होती. " काय गं, आज सकाळीच मावशीची आठवण झाली?" मी म्हटले. " मावशी, आज द्वादशी ’गजानन विजय’ चे पारायण संपले. दर्शनाला आले होते मंदिरात. म्हटले, कॉलनीत आलो तसं मावशींना भेटून जावं. "तिने माझ्या हातावर मोदकांचा प्रसाद देत म्हटलं. "कसं काय चाललयं तुमचं? मजेत ना?" मी म्हटलं. " हो मावशी, अगदी छान!" ती म्हणाली. "भाग्यवान आहेस बाई" मी म्हटलं. " मावशी तेच विचारायला आले होते मी." "काय गं काय विचारणार आहेस? विचार ना." "मावशी, माझे ’भाग्य’ बघायला कधी येणार? दिवस अन्‌ वेळ सांगा. मी स्वतः माझ्या गाडीतून नेणारंय तुम्हाला. अन्‌ हो मावशी, गाडी मीच चालवणार आहे."