Name of Book : राजा राममोहन रॉय

Name of Author : ल.भा. कुरकुरे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 82

Synopsis :
राममोहनांच्या स्त्रीविषयक विचारकार्याला या पुस्तकात मध्यवर्ती स्थान दिले आहे ते योग्य असेच आहे, कारण आज इतक्या वर्षानंतर परिस्थिती एवढी बदललेली असूनही स्त्रियांना जे हक्क मिळवून देण्यासाठी रॉय यांनी हाडाची काडे केली होती, ते हक्क पुरतेपणी मिळाले आहेत, असे म्हणण्याची सोय नाही. सतीच्याप्रथेला शास्त्राधार नाही हे जनतेच्या कानीकपाळी ओरडून सांगणारे व कायद्याव्दारे या अमानुष प्रथेला आळा घालण्यासाठी सरकारला भाग पाडणारे राजा राममोहन रॉय यांचे ते श्रम पुन्हा करावे लागणार नाहीत, कारण सतिप्रथा आता इतिहासजमा झाली आहे, असे आपण समजत असतानाच राजस्थानात कुणी रुपकुंवर सती जाते, तिथली राजपूत सभा त्या प्रसंगाचे समर्थनच नव्हे, तर गौरवीकरण करते, सतीच्या समाधीच्या ठिकाणी मोठाल्या यात्रा भरतात आणि सती जाणे हा स्त्रीगुणांचा परमोच्च बिंदू असल्याचे संदेश राजरोसपणे समाजात प्रसृत होतात ही सुन्न करणारी वस्तुस्थिती आपल्यासमोर येते आणि रॉय यांचे विचार व कार्य नीट समजावून घेण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे स्त्रीला व्यक्ती म्हणून स्वतंत्र अस्तित्व असते हे आग्रहाने मांडणाऱ्या राममोहनांना लेखकाने दिलेले अर्घ्यदान प्रसंगोचित ठरते.