Name of Book : विवाह वेदीवर

Name of Author : सौ सुमन भडभडे

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 208

Synopsis :
’खळाम्-खळ्-धडाम् धड्.....’ एकदम झालेल्या आवाजानं बेहोशीच्या सीमारेषेवर पोहचू पाहणाऱ्या गोदावरीला दचकून शूध्द आल्यासारखी वाटली. मेंदूला काहीतरी जाणवल्यासारखं वाटलं; पण ते काय हेच तिला कळेना, आणि त्या कळण्याच्या धडपडीत तिच्या मेंदूत अधिकच गुंता व्हायला लागला. गोदावरीनं डोळे उघडण्याच्या प्रयत्न केला; पण पापण्या जाड ढापणासारख्या डोळ्यावर घट्ट बसल्या होत्या. अंग हलवण्याचा प्रयत्न केला; पण सारे अवयव जणु दगडासारखे जमिनीवर स्थिर झाले होते. एखादी दगडी मूर्ती कुणीतरी जमिनीवर कशीतरी आडवी पाडावी तशी ती पडली होती. तिचं डोकं जड झालं होतं, जणू डोक्यात शिसं भरलं होतं, इतर अवयवांपेक्षा हे जडपण काही वेगळचं होतं, आणि गंमत म्हणजे त्या शिशातला मेंदू हळुहळू जागा होत होता, अनेक संवेदना त्याला हसत होत्या, त्यामुळे आतापर्यंत साऱ्याच्या पलीकडे गेलेली गोदावरी त्या अर्धवट संवेदनानी त्रस्त होत होती.