Name of Book : समुद्र

Name of Author : प्रा. माधुरी शानभाग

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 193

Synopsis :
पोटात शंख शिंपले, रत्ने माणके, कोट्यावधी सजीव लपवुन, दुरुन अत्यंत मोहक दिसणारा समुद्र कुठेतरी स्त्रीशी साधर्म्य दर्शवतो. आपले रागलोभ, सुखदुःखे सहन केलेले घाव आणि विचारांचे आवर्त पोटात रिचवुन हसतमुखाने वावरणाऱ्या स्त्रीच्या रुपात आणि समुद्रात मला नेहमीच विलक्षण साम्य दिसत आले आहे. त्याला किनाऱ्याचे तर हिला संस्कारांचे, समाजाचे अन रुढींचे बंधन आहे. काळाने स्त्रीला कितीही नवी वरदाने दिली, तिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र, आत्मनिर्भर केले तरी नियती नावाची अदृष्य शक्ती परिस्थिती नावाचे वादळ यांच्याशी तिला पदोपदी टक्कर द्यावी लागते. मला भावलेल्या बीजाना कथारुप देऊन मांडलेल्या कहाण्या या संग्रहात एकत्रित वाचताना वाचकांना त्यात आसपासच्या स्त्रीपुरुषांच्या प्रतिमा उमटलेल्या दिसतील.