Name of Book : वृत्तान्त

Name of Author : भालचंद्र देशपांडे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 146

Synopsis :
कधी काळी आपल्या समाजव्यवस्थेत पत्रकारितेला धर्माचे आणि पत्रकारांना धर्माधिकाऱ्यांचे स्थान होते. समाज प्रबोधन, सामाजिक सुधारणा व थोडेफार मनोरंजन ही वर्तमानपत्रे चालविण्यामागची उद्दिष्टे होती. देशात १९९१ च्या सुमारास मुक्त अर्थव्यवस्थेचे वारे वाहू लागले तसे वृत्तपत्र व्यवसायाचे झपाट्याने व्यापारीकरण झाले. या व्यवसायाची उदात्त उद्दिष्टे मागे पडली. त्याची जाग पैसा कमविणे, वैयक्तिक हितसंबधाचे रक्षण करणे या नव्या उद्दिष्टांनी घेतली. हा सामाजिक बदल का व कसा घडला त्याचा हा ’वृत्तांत’ टिपला आहे पत्रकार साहित्यिक भालचंद्र देशपांडे यांनी. देशपांडे यांच्या आतापर्य़ंतच्या आठ साहित्यकृतींना वाचकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. देशपांडे यांचा हा नवा कथासंग्रह वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करील. याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही.